पुणे

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा परिषद सदस्या सुरेखा चौरे यांचे आवाहन

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात कोरोना प्रसार वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, केंद्र व राज्य सरकारने लस उपलब्ध करून लसीकरण मोहीम प्रभावी राबविल्यास कोरोनावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सुरेखा चौरे यांनी केले.
जिल्हापरिषद सदस्या व समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे यांच्या माध्यमातून व वडकी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वडकी, पिंपळमळा येथे काल ४५ वर्षावरील सुमारे ३०० नागरीकांना लस देण्यात आली.
वडकी गावामध्ये २ एप्रिल पासून लसीकरण चालू ठेवले आहे. सुमारे १६०० नागरीकांनी लसीचा लाभ घेतला आहे. वडकी ग्रामस्थांच्या वतीने सुरेखा चौरे व लसीकरणसाठी आपले स्वत:चे गोडाऊन उपलब्ध करून देणारे राजूदादा पवार याचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सरपंच अरूण गायकवाड, उपसरपंच शितल मोडक, सचिन मोडक, संदिप धाडसी मोडक, अमोल मोडक, पै. दिलीप मोडक, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मोडक, सागर मोडक, कावेरी मोडक, वैयजंता मोडक, स्नेहा मोडक, तुकाराम आबा मोडक, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, रविशेठ पवार, सुनिल पवार अविनाश मोडक, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे संचालक सगाजी केरबा मोडक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल हिरामण मोडक व रविशेठ पवार यांनी केले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x