पुणे

पूर्व भागात हडपसर मध्ये जम्बो कोव्हीड सेंटर व्हावे – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी)
महापालिका हद्दीतील हडपसर उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे त्यातून परिसरातील सर्वच रुग्णालयांवर ताण येत आहे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने हडपसर येथे सर्व सुविधांसह जम्बो कोव्हीड केअर सेंटर उभारावे अशी आग्रही मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.
हडपसर येथे जम्बो कोव्हीड सेंटर व्हावे यासाठी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, नगरसेविका शहर संघटिका संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, विधानसभा समन्वयक तानाजी लोणकर, विभाग प्रमुख प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर आदी उपस्थित होते
हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे गेल्या आठवड्यात आयुक्त विक्रमकुमार यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्याने यावर चर्चा करण्यात आली व ग्लायडिंग सेंटर व्यतिरिक्त इतर कोठेही हडपसर परिसरात जम्बो कोबड सेंटर उभारले तरी चालेल हडपसर येथे जम्बो कोव्हीड सेंटरची अत्यंत गरज असून पालिकेच्या वतीने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी असे आढळराव पाटील यांनी सांगितले. हडपसर परिसरात प्रामुख्याने माळवाडी, 15 नंबर, महादेवनगर व इतर भागात देखील लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करून लसीचा योग्य तो पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या सर्व विषयी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी सांगितले.

“पालिकेचा पूर्व भागावर कायम अन्याय का”
पुणे महापालिका कायम पूर्व भागावर विकासकामांवरून दुजाभाव करत असते, येथे कचऱ्याचे प्रकल्प केले जातात पण कोरोना प्रभाव बांधत असताना जम्बो कोव्हीड सेंटर, लसीकरण व इतर वैदकीय सुविधांबाबत कायम अन्याय केला जात आहे, हडपसर चे नागरिकही पालिकेला कर भरतात मग नागरी सुविधा पूर्व अन्यथा शिवसेना स्टाईल ने उत्तर द्यावे लागेल.
प्रमोद नाना भानगिरे
नगरसेवक पुणे मनपा

0 0 votes
Article Rating
331 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments