पुणे

शिवसेनेचे सामान्यांच्या मदतीसाठी एक पाउल पुढे -प्रा. होडे

 

पुणे ः प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये महाराष्ट्र सरकार खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध केल्यामुळे व्यवसाय, उद्योगांना खीळ बसली आहे. त्यामुळे व्यवसायिकांबरोबर नोकरदार वर्गाची मोठी अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य, गरजू, कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचवत आहे. शिवसेनेना नेहमीच सामान्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे काम करीत आहे, असे मत हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक प्रा. विद्या होडे यांनी व्यक्त केले.

हडपसर (सातवववाडी) येथे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अनुदान योजनेचे ऑनलाइन फॉर्म नोंदणी केंद्राचे सुरू करण्यात आले. याप्रसंगी शहरसंघटक गटप्रमुख जान मोहम्मद शेख, विभागप्रमुख प्रशांत पोमण, शाखाप्रमुख योगेश जैन, अमोल यादव, दत्ता खवळे, बाळू पडवळ, गणेश होडे, मंगेश उंद्रे, अल्ताफ शेख, सचिन ढवळे, बाळा यादव, रोहित कांबळे व परिसरातील लाभार्थी रिक्षाचालक उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे काम समन्वयक प्रा. विद्या संतोष होडे यांनी सुरू केले आहे.

उपशहरप्रमुख समीर आण्णा तुपे म्हणाले की, शासकीय योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांमध्ये पोहोचविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. कठीण काळामध्ये शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शासकीय योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेऊन आपले कुटुंबियांचे जीवनमान सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x