पुणे (प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरातील घटकांना सामावून घेत, सामान्यांना न्याय मिळेल याकरिता प्रयत्नशील आहे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपक्रम राबवावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल पुणे शहर, साई वैभव रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा संघटना,
खा. डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालकांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या हस्ते या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली, यावेळ नगरसेवक योगेश ससाणे, स्वीकृत सदस्य अविनाश काळे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विठ्ठल विचारे, माजी नगरसेवक सुनील बनकर, डॉ. शंतनु जगदाळे, संजय शिंदे, शितल शिंदे, सौ.ढेबे ताई, पवन काळे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
परिवहन विभागाकडुन प्राप्त माहीतीनुसार परवाना धारक रिक्षा चालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य आँनलाईन प्रक्रिया बेबसाईटबाबत
महाराष्ट्र् रिक्षा स्टॅंड, साई प्रतिष्ठान काळेपडळ रेल्वेगेटजवळ, हडपसर येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल पुणे शहराध्यक्ष
योगेश जगताप यांनी केले आहे.
संपर्क : साई वैभव रिक्षा संघटना अध्यक्ष आस्था फाऊंडेशन विशेष कार्यकारी अधिकारी 8855944522, गुलाब सय्यद – अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा संघटना, हडपसर विभाग
77418 07186
शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध – प्रशांत जगताप – शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

36 Comments
Oldest