पुणे

कुंजीरवाडीच्या सरपंचांना जामीन

लोणी काळभोर दिनांक  ( स्वप्नील कदम ) –

मोक्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या लोणी काळभोर येथील कुख्यात गुंड शुभम कैलास कामठे यास कोरोना लस देण्याची शिफारस केली म्हणून अटक केलेल्या कुंजीरवाडी ( ता.हवेली ) येथील सरपंच अंजू गायकवाड यांना मोका न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. गायकवाड यांच्या जामिनासाठी अॅड विजयसिंह ठोंबरे यांनी विशेष मोक्का न्यायाधीश एस. ए . नावंदर यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. अॅड. ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष मोक्का न्यायाधीश मे .एस. ए . नावंदर यांनी गायकवाड यांना मुक्त केले. अॅड. विजयसिंह ठोंबरे,अॅड .शिवम पोतदार व अक्षय खडसरे यांनी काम पाहिले.