पुणे

जयहिंद गृप व आदर पुनावाला क्लिन सिटी टिम कडून स्वच्छता अभियान सर्व्हिस रोड झाले चकाचक

कदमवाकवस्ती प्रतिनिधी – स्वप्निल कदम
कदमवाकवस्ती ता. हवेली येथील पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावामधील असलेल्या एमआयटी कॉर्नर सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले होते. जय हिंद ग्रुप समतानगरच्या तरुणांनी व आदर पूनावाला(क्लीन सिटी टीम)यांनी एकत्र येऊन कचरा उचलला.त्यांच्या या कार्याबाबत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीने १ ट्रॅक्टर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने २ ट्रॅक्टर व १ जेसीबी मशिन दिल्याने सदर ठिकाणचा हा कचरा उचलण्यासाठी अभिजित ऊर्फ पप्पू बडदे,निखिल लोहारकर,विक्रम ठोंबरे,प्रशांत चव्हाण,अभिजित पाचकुडवे, दिनेश भाटी, विजय शिंदे, सूरज लोंढे, दशरथ कोटीयान, हॉरस खान, गजानन शिराळे, वैभव चंदनशीवे, संजय शिंदे, अरबाज शेख, शब्बीर करिगर, धनंजय चव्हाण, साद शेख, बाप्पू साबळे व यज्ञेश मगर यांनी मदत केली. या ठिकाणी व्यावसायिक कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते.या घाणीमुळे पुलाखाली असलेल्या सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी पसरल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने जयहिंद ग्रुप व आदर पुनावला(क्लीन सिटी टीम)यांच्या संयुक्त विद्यमाने साफसफाई करून परिसर साफ करण्यात आला. तर या ठिकाणी व्यावसायिकांनी कचरा न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत टाकावा असे आवाहन जयहिंद ग्रुपच्यावतीने करण्यात आले. गेले काही वर्षांपासून लोणी स्टेशन येथील तरुणांनी सुरू केलेला जयहिंद ग्रुप समाजाकार्यात अग्रगण्य असून प्रत्येक रविवारी ते परिसरातील एखादा भाग स्वच्छ करतात.यापूर्वीही लोणी स्टेशन येथील पालखीस्थळावर घाणीचे साम्राज्य पसरले होते त्यावेळी देखील जयहिंद ग्रुपच्यावतीने पालखीस्थळ स्वच्छ सुंदर बनविण्यात आला.प्रत्येक रविवारी नित्यनियमाने ग्रुपचे परिसर साफ करायचे काम न चुकता केले जाते.यामुळे समाजातील वेगवेगळ्या संघटना व संस्थेच्यावतीने त्यांचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले आहे.सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात तरुणांनी सुरू केलेले ग्रुप पाहता त्या ग्रुपच्या माध्यमातून समाजात दहशत,भांडणे तंटे,राजकीय कार्य असेच कार्य जास्त प्रमाणात दिसून येतात परंतु याउलट जयहिंद ग्रुपमधील सर्व सदस्य आपले शिक्षण,नोकरी व व्यवसाय सांभाळून समाजकार्यात पुढे असल्याने या ग्रुपचे पूर्व हवेली परिसरात कौतुक होत आहे.व अश्या ग्रुपच्या माध्यमातून कसे समाजकारण करता येते अशी उदाहरणे नागरिक आपल्या पाल्यांना देताना दिसत आहेत.