हडपसर प्रतिनिधी (24) रयत शिक्षण संस्था ही त्यागातून उभी राहिलेली संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हीच कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. कर्मवीरांनी गोरगरीब व वंचित समुदायासाठी काम केले. महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे कार्य कर्मवीरांनी केले. कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह काढून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजवला. .रयत ही एक वेगळी संस्कृती आहे .रयतेचे कार्यकर्तेही कर्मवीरांच्या संस्कृतीत तयार झाले आहेत. रयत सेवक निर्मळ आहेत. त्यांचा समाजावर उत्तम परिणाम होतो. महात्मा फुले यांचे माणूस घडविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. वंचितांसाठी काम करूया .कर्मचाऱ्यांचा वैज्ञानिक जाणिवा पेरणारा विचार स्वीकारू या, असे विचार पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंती समारंभ प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. जनार्दन जाधव यांनी एस. एम. जोशी कॉलेज मध्ये विचार व्यक्त केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे यांनी कर्मवीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले .ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार वारसा जोपासू या. कोरोनाच्या काळातही रयतेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले .प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केला. त्यागमय जीवनाची अखंड गाथा म्हणजे कर्मवीरांचे जीवन होय. बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे कर्मवीरांनी खुली केली, असे विचार त्यांनी व्यक्त केले .जयंतीनिमित्त कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले .भित्तिपत्रिकेचे उद्घाटन साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. रंजना जाधव यांनी त्याचे संयोजन केले .काव्य लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. स्पर्धा प्रमुख म्हणून डॉ. राजेंद्र ठाकरे ,डॉ. अतुल चौरे ,डॉ .विश्वास देशमुख यांनी काम केले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम एन .एस. एस. विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला. डॉ. सुनील कुंटे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी वृक्षारोपणाचे आयोजन केले .प्राचार्य डॉ. संजय जडे , उपप्राचार्य डॉ. संजय जगताप डॉ. किशोर काकडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर प्रशासकीय सेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एस.एम. जोशी कॉलेज मध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न हडपसर
September 25, 20210

Related Articles
November 7, 2020603
एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठी मजूरांची टंचाई
फेब्रुवारी 2020 मधे भारतातील बेरोजगारी रेकाॕर्ड ब्रेक वाढली होती. त्यानंतर ल
Read More
September 12, 20210
“मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका”
पुणे : गेल्या पाच वर्षात शहरातले मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला सपशेल अपयश
Read More
March 20, 20220
पत्नी व पत्नीच्या घरच्यांना कंटाळून तरुणाने केली आत्महत्या हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
लोणी काळभोर | पत्नी सासु ,मेहुणा वं इतर दोन जणांच्या छळाला कंटाळून उरुळी
Read More