हडपसर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम .जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र , इलेक्ट्रॉनिक व आय. क्यू. ए .सी .यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी केले आहे. या वेबिनारचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कोरियाचे प्रोफेसर यंग पाक ली हे करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अरविंद शालिग्राम हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच अधिष्ठाता (सुरत) डॉ. निशाद देशपांडे व संभाजी शिंदे डॉ. नागेश मैले, लंडनचे डॉ. सचिन सेंदिया हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोले राहणार आहेत .अशी माहिती एस .एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली .,उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय.क्यू.ए. सीचे चेअरमन डॉ. किशोर काकडे,भौतिकशास्त्र विभागप्रमुख, समन्वयक प्रा. मोहनसिंग पाडवी ,सहसमन्वयक डॉ. रत्नमाला वाघमोडे, प्रा. महेश बागल प्रा. दिनेश लोहार, प्रा. हेमंत देव करणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
October 5, 20210
Related Articles
June 15, 20230
पालखी प्रस्तान अन महापालिका यंत्रणेची लगबग…
हडपसर परिसरात पालखी मार्गावर गोळा झाला तब्बल २० टन ८६० किलो कचरा
हडपसर - मु
Read More
December 27, 20210
पोलीसांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांना अटक
हवेली प्रतिनिधी - अमन शेख
तहसीलदार हवेली यांचे महसूल पथकाला मारहाण करून ट
Read More
November 29, 20210
वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी :-अमन शेख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट ६ च्या हद्दीमध्
Read More