पुणे

दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून आईला काठीने बेदम मारहाण – दारुड्या मुलास अटक

प्रतिनिधी – स्वप्नील अप्पा कदम

पुणे : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून आईला काठीने मारहाण केली असता लहान भावाने विचारणा केली की आईला का मारले तर थेट लहान भावाच्या छातीत भाला खोसल्याची घटना घटना राजगुरुनगर येथील पापळवाडी चास येथे घडली आहे. या घटनेत प्रवीण लक्ष्मण शिंदे वय 40 गंभीर जखमी झाला असून आरोपी सुनील लक्ष्मण शिंदे यास खेड पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी आईकडे दारुसाठी पैशाची मागणी सुनील करत होता आईने नकार दिल्यामुळे चिडून सुनील याने आईला काठीने जबरदस्त मारहाण केली हा प्रकार लहान भाऊ प्रवीण याला कळताच त्याने विचारणा केली की आईला का मारले हा राग मनात ठेवून साप मारण्यासाठी च्या भाल्याने सुनील याने प्रवीण या लहान भावाच्या छातीत वार केला. प्रवीण याने वार रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपयश आले आणि त्याच्या छातीत खोलवर भाला रुतला. त्याचप्रमाणे आईला सुद्धा जमिनीवर ढकलून दिले भांडण थांबवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली असता आरोपी सुनील याने मोटारसायकलवरून पळ काढला परंतु खेड पोलिसांनी त्याला अटक केली. असून प्रवीण वर पुढील उपचार पुणे येथील ससून रुग्णालयात सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुढील तपास पोलीस हवालदार आर. एन .कबुगडे करत आहेत.