मंचर : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन) –
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर हल्लेखोरांनी मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असुन पोलिस सखोल चौकशी करीत आहेत.
जखमी झालेल्या काळूदास दांगट यांना तातडीने रूग्णालया दाखल करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडीमध्ये ही घटना घडली आहे. दांगट यांच्यावर हल्ला कोणी आणि कशामुळे केला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. दि. 29 रोजी शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदान होते म्हणजेच शिरूर मतदार संघातील मतदान कालच पार पडले. मतदान झाल्यानंतर काही तासाच दांगट यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. मंचर पोलिस अधिक तपास करीत आहेत.