सोलापुर

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

सोलापूर : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन )
राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला.

0 0 votes
Article Rating
176 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments