बीड

फेसबुकवरील मैत्री पडली महागात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

बीड : सोशल मीडियाचा कोण कधी कसा अन् कोणत्या कामासाठी वापर करेल, याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत एकाने ३५ वर्षीय विधवा महिलेवर, लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला व नंतर मोबाइल बंद करून भेटणे टाळले. ही घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे.पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता ही ३५ वर्षीय विधवा असून, ती बीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आपल्या १० वर्षीय मुलासोबत राहते. वर्षभरापूर्वी फेसबुकवर तिची ओळख सम्राट गित्ते रा.परळी याच्याशी झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. ६ महिन्यांपासून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू झाले होते. गेल्या ६ महिन्यांत सम्राट गित्ते याने पीडितेवर विविध ठिकाणी नेहून बलात्कार केला आहे.एका हॉटेलात नेऊन त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ सुरू केली होती. शिवाय ४ दिवसांपासून मोबाइल बंद करून संपर्क देखील तोडला होता. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी सम्राट गीत्तेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळ हे बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा पिंपळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे