महाराष्ट्र

बापानेच अल्पवयीन मुलाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना..

अकलूज : प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लहान वयातच गुटखा खातो, व्यसन करतो, चोऱ्या करतो म्हणून बापानेच अल्पवयीन मुलाची गळा दाबून हत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली आहे. यात आश्चर्य म्हणजे मृताच्या आईने, आरोपीच्या पत्नीनेच फिर्याद दिली.याची अकलूज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेतील आरोपी प्रशांत सावंत यास पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील आंबेडकर चौकात राहणाऱ्या प्रशांत अर्जुन सावंत याचा मुलगा आलोक प्रशांत सावंत (वय १२ वर्षे) हा अल्पवयातच गुटखा खाऊ लागला व इतर व्यसन करु लागला. यातच त्याला चोरीची सवय लागली होती. यापूर्वी मयत आलोकने दोन वेळा चोऱ्या केल्या होत्या. त्याची भरपाई वडील प्रशांतने केली होती.मुलाच्या सततच्या गैरकृत्याने आपली सतत बदनामी होत असल्याने बाप पुरता वैतागला होता. अशातच आलोकने नुकतीच आंबेडकर चौकातीलच धाईंजे यांच्या घरी चोरी केली होती. ही चोरी पकडली गेल्याने व चोरी केल्याची आलोकने कबुली दिल्याने झालेल्या बदनामीमुळे वडील प्रशांत अधिकच संतापला होता.मुलगा लहान वयातच व्यसन करतोय, चोऱ्या करतोय, अनेकदा सांगितलं तरी ऐकत नाही. यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे, याची वडील प्रशांतच्या डोक्यात अधिकच चिड निर्माण झाली. आता मुलाचा कायमचाच बंदोबस्त करायचा, असा निश्चय मनात करुन बापाने मुलगा अलोक यास गोड बोलुन चल तुला खाऊ देतो, असे अमिष दाखवून श्रीराम थियटर जवळली कठड्यात नेले. त्या ठिकाणी मोका साधून सख्या मुलाचा गळा दाबून खून केला.मयत मुलाची आई व आरोपीची पत्नी भारती प्रशांत सावंत (वय 29 वर्षे ) हिने सदर गुन्ह्याची फिर्याद अकलुज पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादेवरुन अकलूज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 836/2021 भा द वि 302 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. घटनेतील आरोपी प्रशांत अर्जुन सावंत (वय 34) यास पोलीसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पो नि अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी मारकड करीत आहेत