पुणे

कदमवाकवस्ती- तरुणाचा अपघाती मृत्यू

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर : दूध डेअरीत बिल देण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन तरुणास रिक्षा ने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडला. यश जीतेद्र पवार ( वय १७, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा चुलत भाऊ विशाल प्रकाश पवार यांनी फिर्याद दिली. यश हा लोणी स्टेशन येथील दूध डेरी मध्ये बिल देण्यासाठी निघाला होता. त्या वेळी रिक्षा चालकाने दुचाकीस धडक दिली.