हवेली

पुर्व हवेलीचे भाजपा अभ्यास वर्ग प्रशिक्षण शिबीर फुलगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

प्रतिनीधी : स्वप्नील कदम
        रविवार दीनांक 12 डीसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी पूर्व हवेली  तालुका कार्यकर्ता  प्रशिक्षण शिबिर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय,  फुलगाव येथे अतिशय छान व उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता हवेली तालुक्याचे मा. आमदार लोकनेते आदरणीय बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमाचे 1 ले सत्र पुणे जिल्हा परिषद गटनेते मा  शरद बुट्टे पाटील यांचे झाले कार्यकर्ता ,पदाधिकारी ,उमेदवार ,निवडणूक व त्याचे नियोजन ,या संबंधी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे 2 रे सत्र  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी गोगावले यांचे झाले या सत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहीती व केंद्र शासनाची होत असलेली उल्लेखनीय कामगिरी याची माहीती दीली .
     कार्यक्रमाचे 3 रे सत्रामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्राची रणरागिनी चित्राताई वाघ यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थिती , महिलांचे वास्तववादी प्रश्न , भ्रष्टाचार राजकारण यावरती अनमोल असे मार्गदर्शन केले .  कार्यक्रमाचे 4 थे सत्र पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांचे झाले या सत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे  स्थापना पुर्वापासून आतापर्यंत चे पूर्ण कार्य तसेच जनसंघाचे विषयी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे 5 वे सत्रामध्ये जिल्हा संघटन सरचिटणीस अँड धर्मेंद्रजी खांडरे साहेब यांनी 370 कलम , सी.सी.ए ,एन.आर.सी. व जी.एस.टी. या कायद्याबाबत उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवटचे व 6 वे सत्र किसान मोर्चा  प्रदेश अध्यक्ष वासुदेवजी काळे साहेब यांनी घेतले या सत्रामध्ये शेतकरी , कृषी कायदा , शेतमाल विषयी , शेती करार व सद्याची शेतकरी बांधवांची परिस्थिती याविषयी अतिशय छान मार्गदर्शन करून सर्वांची मने जिंकली.
     कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद मा अध्यक्ष माननीय प्रदीप दादा कंद व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदासशेठ उंद्रे यांनी केली या कार्यक्रमास  भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेशजी कुटे ,जिल्हा सरचिटणिस सुदर्शन चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष  दादासाहेब सातव , प्रविणनाना काळभोर , सुनिल कांचन , जिल्हा पदाधिकारी विकास जगताप ,श्रीकांत कांचन ,पुनमताई चौधरी , सारीकाताई लोणारी , अजिंक्य कांचन , संदीपआबा सातव , जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष अमोल शिवले , महीला अध्यक्ष सुप्रियाताई गोते , युवा अध्यक्ष अनिल सातव व   हवेली तालुक्यातील सर्व मोर्चा , आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन हवेली भाजपाचे अध्यक्ष  पै संदीप आप्पा भोंडवे , कार्याध्यक्ष  शामराव गावडे ,सरचिटणिस  गणेश चौधरी , विजय जाचक व हवेली तालुका कार्यकारणी यांनी केले .