पुणे

पोलीसांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

  हवेली प्रतिनिधी – अमन शेख

तहसीलदार हवेली यांचे महसूल पथकाला मारहाण करून ट्रक पळवुन नेलेल्या वाळूमाफियांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या हडपसर  पोलीसांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

             याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतापसिंह माणिकराव शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष बाळासाहेब वाघमारे (वय ३५, रा. नायगांव, ता हवेली), दिपक विठठल शिंदे (वय ३२, रा. कुंजीरवाडी), शिवाजी कांतीलाल काळभोर (वय ३९, रा. स्वामीसमर्थ मंदिर, कुंजीरवाडी) अमिर गुरूलाल नदाफ (वय २२, रा. ढोलेपाटील रोड, ताडीवाला रोड, इनाम मस्जिद, पुणे), रोशन दिलीप कुंजीर (वय ३१, धंदा शेती, रा. कुंजीरवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. यांचेसमवेत राहुल कंजीर व इतर ८ ते १० जणांविरोधात शासकिय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ डिसेंबर रोजी तहसीलदार हवेली यांचे स्टाफला मारहाण करणारे वाळूमाफियांचा शोध घेणेसाठी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके हे सहप्रभारी अधिकारी सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदिप सोनवणे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, शाहिद शेख यांचेसह २५ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ – २० वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील धनश्री लॉन्सचे अलीकडे मोरया गॅरेजच्या समोर पोहोचले. त्यावेळी महामार्गाचे  पलीकडच्या बाजुला असलेल्या गोल्डन मोटर गरेजमध्ये असलेला व महसूल खात्याचे ताब्यातून वाळु ट्रक क्रमांक एमएच १२ एफझेड ३२४० पळवुन नेण्यात सहकार्य करणारा नदाफ हा दिसला. पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी त्याने तुम्हाला मला नेणे खुप महागात पडेल अशी धमकी दिली.  त्यानंतर गॅरेज मालक शिवा काळभोर तेथे पोहोचला त्यानेही आमच्या नादाला लागु नका आम्ही स्थानिक आहोत तुम्हाला सोडणार नाही असे म्हणुन आरडाओरडा केला. नदाफ यास समजावुन सांगत असताना शेळके यांना तुम्ही कोण मला विचारणारे जास्त शहाणपणा करु नका तुमचे तुम्ही काम करा असे म्हणुन माझ्या नादी लागु नका नाहितर तुम्ही याठिकाणावरुन परत जावु शकणार नाही असे म्हणत असतानाच त्याचा मित्र रोशन कुंजीर हा त्याची काळ्या रंगाची ज्युपीटर गाडी घेवून आला व शेळके यांचे अंगावर धावून येवून तु कोण रे कुत्या मुस्काड फोडीन असे बोलुन शिवीगाळ करून अंगावर धावुन येत होता.

                 त्यावेळेस त्या ठिकाणी एमएच १२ एमव्ही २३२३ टोयोटो फॉरच्युनर मधुन रोशन कुंजीर याने फोन करून बोलावलेले दोघे व ईतर ८ ते १० जण तेथे आले. त्यांनी पोलिसांचे खाजगी गाडीला फॉरच्युनर गाडी आडवी लावुन मोठमोठयाने आरडाओरडा करुन तुम्ही अमिरला घेऊन गेलात, तर आम्ही तुमची गाडी जाळुन टाकु असे म्हणुन धमकी दिली. पोलीस निघुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना कुंजीर याचे सांगण्यावरून संतोष वाघमारे वाहनासमोर आडवा झोपला. त्यांनी सर्वांनी मिळुन आम्हाला जाण्यास अटकाव केला. त्यानंतर कुंजीर याने असे कित्येक पोलीस आम्ही खिशात घेवून फिरतो. मी यापूर्वी एक मर्डर केला आहे, तरी पोलीस माझे काही वाकडे करू शकले नाहीत असे बोलुन आरडाओरडा केला. त्यानंतर दिपक शिंदे याने  गॅरेजमधील लोखंडी टॉमी घेवुन दुधाळ यांचे अंगावर धावुन जावुन हाताने धक्काबुक्की केली. त्यानंतर हडपसर पोलीसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अधिक कुमक मागवुन घेतली. व तक्रार दाखल केली.