पुणे

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात राखी खवले यांचे सोनेरी यश ; पोलीस दलात सर्वत्र कौतुक

लखनऊ (उ.प्र) – रोखठोकमहाराष्ट्र ऑनलाईन

येथे दि 16.07.19 ते 20.07.19 दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात भारतातील सर्व राज्याच्या संघामधून महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल पटकाऊन राज्य पोलिस दलाचा सन्मान वाढवला. महाराष्ट्राला 62 वर्षात प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे त्यामुळे संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संघात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन पोलिसांची निवड करण्यात आली होती.त्यांना सुमारे 2 महिने विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या मेळाव्यासाठी पुणे जिल्हा पोलिस व सध्या गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत असलेल्या सौ राखी खवले यांची निवड करण्यात आली होती.
*अखिल भारतीय मेळाव्यात विशेष म्हणजे केशवनगर येथील रहिवासी सौ. राखी खवले यांनी सांयटिफीक एड टू इन्व्हेस्टीगेशन या प्रकारात सुवर्ण पदक पटकाऊन महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली असून महाराष्ट्र पोलीस दलास सर्वसाधारण विजेतेपद मिळण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे*.
या यशासाठी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा कौतुक व सत्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक श्री सुबोध जैस्वाल यांनी मुंबई येथे केला आहे. तसेच पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग चे प्रमुख श्री. अतुलचंद्र कुलकर्णी , अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी सत्कार केला आहे.
या स्पर्धेमुळे महाराष्ट्र पोलिस दल भारतात सर्वोत्तम असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 months ago

Servislerimiz sayesinde sms onay sizde en uygun fiyatlardan mobil hesap sms telefon onay yaptırabilirsiniz.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x