हडपसर/पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
महापालिकेने प्रभाग समितीवर निवडलेले स्वीकृत सदस्याने संस्थेचे चुकीचे कागदपत्रे समाविष्ट केल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून सदस्यांची निवड केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड.लक्ष्मी शंकर माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल केली आहे. स्वीकृत सदस्य निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव झाल्याने दोन याचिका दाखल झाल्या आहेत त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांवर टांगती तलवार आहे.
महापालिकेने स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीवर तीन सदस्य निवडण्यात आले. यामध्ये निवडलेले सदस्यांनी सादर केलेले श्री बालाजी प्रतिष्ठान हि संस्था, दिनांक ४ मार्च २०१७ रोजी स्थापन झाली आहे. या संस्थेला नियमानुसार तीन वर्ष हि पूर्ण झाले नसताना हि संस्थची कागदपत्रे पालिकेने ग्राह्य धरली आहेत. एक राजकीय सदस्य हा सहावी शिक्षण झालेला आहे, अर्जात तसे त्यांच्या शैक्षणिक पुरावे फॉर्म सोबत जोडले आहेत.
उच्च शिक्षतांना डावलून सहावी शिक्षण झालेल्या सदस्याची निवड करणे व चुकीच्या कागदपत्रांवर सदस्य म्हणून निवड केल्याचा पराक्रम पालिकेने केला असल्याचा आरोप अॅड. माने यांनी केला आहे. असाच प्रकार हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये झाला आहे. येथे निवड केलेले मनोज घुले यांनी जोडलेले श्री सह्याद्री बहुउद्देशीय सेवा भावी संस्था हि सोलापुर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त चे प्रमाणपत्र आहे. मात्र हे नियमाने पुणे जिल्ह्यात संस्था नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. याबाबत अॅड. लक्ष्मण घुले यांनी ही या अगोदरच याचिका दाखल केली आहे, पुणे महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने स्विकृत सदस्य निवड प्रक्रिया राबविल्या बाबत निवड होण्या अगोदर उच्च न्यायालयात याचिकेत म्हटले आहे.
