पुणे

“बार्शी मधील गुंतवणूकदारांचे प्रकरण, इंदापूर तालुक्यातील २०० कोटींचे भिशी प्रकरण गाजत असताना…. “हडपसरमध्ये भिशी प्रकरणात ‘कोट्यावधी’ रुपयांना गंडा घालणाऱ्यांचा “पर्दाफाश” कधी होणार? “गुंतवणूकदारांना धमकी देणारा सूत्रधाराचा “पार्टनर’ गजाआड होणार का?

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज विशेष प्रतिनिधी)
बार्शीमध्ये गुंतवणुकीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेले प्रकरण ताजे असतानाच इंदापूर मध्ये २०० कोटी रुपयांना चुना लावलेल्या टोळीचा कारनामा उघड झाला आहे, हडपसर परिसरात नोटबंदीच्या नावाखाली लिलाव भिशीत ‘कोट्यावधी’ रुपयांची नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चा असताना या प्रकरणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे, भिशी मान्यताप्राप्त नाही असे सांगून पोलिसांकडून कारवाईत टाळाटाळ केली जात आहे, हडपसरच्या भिशी प्रकरणात अनेक जण देशोधडीला लागले असून या प्रकरणात न्याय कधी मिळणार असा सवाल निर्माण झाला आहे.
काही वर्षांपूर्वी हडपसर परिसरात दत्त भक्ताने भिशी सुरु केली स्थानिक असल्याने अनेकांनी भिशीत गुंतवणूक केली सुरुवातीला या लिलाव भिशीत चांगला परतावा मिळत असल्याने अनेकांनी पैसे गुंतविण्यास सुरुवात केली, भिशी प्रकरण एवढे वाढले कि हडपसरश हवेली तालुक्यातील शेकडो नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदी केली, भिशीचा सर्व प्रकार कॅश चालत असल्याने कायदेशीर नोंदीचा संबंध नाही त्यामुळे असे भिशीचालक फरार झाले किंवा गुंतवणूक बुडविली कि कायदेशीर कारवाई करताना अडचणी येतात.
नोटबंदीचे कारण देत हडपसर मधील भिशी बंद पडली अन सामान्य, मध्यमवर्गीय, व्यावसायिक, गोरगरीब यांचे करोडो रुपये बुडाले भिशी चालकाने मात्र हात वर करून मोबाईल बंद केले, ज्यांच्याकडून भिशीचे पैसे चालकाला येणे होते ते वसूल करताना साम, दाम, दंड, भेद वापरून पैसे नाही तर घरे बळकावली अन पैसे वसूल केले अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर पीडित नागरिकांनी सांगितले.
भिशी मधील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवूनशेकडो नागरिकांना देशोधडीला लावले अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत, मात्र करोडो रियांची संपत्ती करून मात्र भिशीचालक ऐषोआरामात जगत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

लिलाव भिशी नेमकी कशी चालवली जाते?
भिशीतील प्रत्येक सभासदाने ठरवलेली रक्कम ठरल्या दिवशी भिशी चालकाकडे आणून द्यायची असते. नंतर भिशी या रकमेचा लिलाव करतो. ज्याला पैशाची गरज असेल तो हा लिलाव वाढवत जातो. त्यानंतर भिशीचा लिलाव झालेली रक्कम कट करुन बाकीचे सभासदांना दिले जातात. यात राहिलेल्या रकमेच्या सर्वांमध्ये वाटून घेतले जाते. लिलाव भिषी व बिन व्याजी भिशी या दोन पैकी लिलाव बेसीस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते. त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात.

गुंतवणूकदारांना धमकी देणारा तो सूत्रधाराचा गुन्हेगार “मेहुणा” कोण?
एक स्थानिक दिग्ग्ज असलेल्या एकाने हडपसर मध्ये नोकरी सोडून भिशीचा गोरखधंदा सुरु केला भिशी बंद पडली मग गुंतवणूकदार मागे लागल्याने हडपसर परिसरात अवैध क्लब चालविणारा नुकताच गुन्हा दाखल झालेला मानलेला “मेहुणा’ गुंतवणूकदारांना धमकी देऊन प्रकरणे मिरवीत असतो, दिग्गज सूत्रधार या मानलेल्या मेहुण्याच्या (पार्टनर) खांद्यावर बंदूक ठेऊन गुंतवणूकदारांना दाबले जात आहे, याकडे पोलीस प्रशासन लक्ष देऊन कारवाईचा “श्रीगणेशा” करणार का? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.

हडपसर परिसरातील फसवणूक झालेल्यांची संपर्क साधावा
हडपसर परिसरात भिशी मध्ये गुंतवणुकीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी रोखठोक महाराष्ट्र न्युज शी संपर्क साधावा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वेब चॅनलच्या माध्यमातून वाचा फोडण्यात येईल, गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अशा नराधमांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आमची आहे.
संपर्क – ९८२२०६२८२४ / ९९२3६२३१३

या प्रकरणाची मालिका क्रमशः