पुणे

गुन्हे शाखा युनीट ६ ची तब्बल दीडशे गोण्या गुटखा जप्त करण्याची धडक कारवाई

 

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊरफाटा येथे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा ६ ने सापळा रचून अवैध मार्गाने आलेला तब्बल ५६ लाख रुपयांचा ४ हजार किलो विमल गुटखा जप्त केला.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेचे युनिट ६ मधील पथक गस्तीवर असताना माहिती मिळाली की, पुणे सोलापूर महामार्गावर एक ट्रकमधून प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक केली जात आहे यावर पोलीस निरीक्षक गणेश माने यांना याविषयी माहिती दिली त्यावर सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकाने थेऊरफाटा येथे सापळा रचून आयशर ट्रक क्र एम एच ११ सी एच ६०६८ ताब्यात घेऊन चालक प्रवीण दुर्योधन जाधव रा गुरसाळे ता खटाव जि सातारा यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याचे सांगितले त्यानुसार अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी कोकणे यांना कारवाई साठी बोलून त्यांच्यासमक्ष आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यात १५९ गोण्या गुटखा मिळून आला.याची किंमत ५६, ४८ ८२० असून वाहतुकीसाठी वापरलेल्या ट्रकची किंमत रु २४,५०,००० इतकी आहे परंतु बाजार भावाप्रमाणे या गुटख्याची किंमत दुप्पट असल्याने हा करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ही कामगिरी गुन्हे शाखाचे युनिट ६ चे
पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ॠषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.