प्रतिनीधी: स्वप्नील कदम
लोणी काळभोर ( कदमवाक वस्ती) समाज हितासाठी तसेच समाजामधील अवैध धंदे करणा-या इसमांवर कारवाई उनहोण्यासाठी करीत असलेल्या कामाचा राग मनात धरून तिघांनी एकास हात व लाथाबुक्याने मारहाण करून तसेच कोयता उलट्या बाजुने पाठीवर, उजवे हाताचे दंडावर मारून जखमी केले असल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी अलीरजा परवेझ ईराणी (वय ४८, सध्या रा. विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर, पुणे. मुळ रा. ईराणी वस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून जमीर कंबर ईराणी, फिदा मानुअल्ली ईराणी, हैदर उर्फ बन्या शौकत ईराणी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अलीरजा हे अखिल भारतीय ईराणी समाज विकास संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून काम करतात. संस्थेच्या माध्यमातुन ते समाजाकरीता विविध उपाययोजना मिळाव्यात तसेच ईराणी समाजामधील अवैध धंदे करणारे इसमांवर कारवाई व्हावी याबाबत मागण्या करीत असतात. पाटील इस्टेट शिवाजीनगर, पुणे येथील आलमगीर हॉटेल नावाने हॉटेल चालवुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
समाजामधील अवैध धंदे करणारे इसमांवर कारवाई व्हावी याबाबत मागण्या करीत असलेबाबतचा राग त्यांचे समाजातील जमीर ईराणी (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांस होता. त्याबाबत त्याचे यापुर्वीही वाद झाला होता. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ७ – ३० वाजण्याच्या सुमारांस ते हॉटेलमधील काम आटोपुन अॅक्टीव्हा दुचाकीवरून लोणी काळभोर येथील घरी जाण्यासाठी निघाले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारांस ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याचे पुढे आले. त्यावेळी मागुन एका दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांचे खांदयावर कशाने तरी मारल्याने ते खाली पडले. त्यांनी वर पाहीले असता तिघेही त्यांच्या ओळखीचे जमीर, फिदा व हैदर ईराणी हे होते. दुचाकी वरून उतरून तिघांनी अलीरजा यांना हाताने लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी जमीर ईराणी याने त्याचेकडील कोयता पाठीत व उजवे हाताचे दंडावर उलटा मारला त्यावेळी अलीरजा यांनी त्यांना तुम मेरेको क्यु मार रहे हो ? असे विचारले असता ते फिरसे हमारे धंदे के बिच आनेका नही म्हणुन शिव्या देत तेथुन निघुन गेले. त्यानंतर अलीरजा यानी ससून रूग्णालयात उपचार घेतल्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.