पुणे

पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यात

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथील राजेंद्र पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहाजणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले तर अंधाराचा फायदा घेत त्यातील चारजण पळून गेले. घटना बुधवारी (ता. ०२) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी कुणाल नारायण जाधव (वय – २२, रा. ओमकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर), ऋषीकेश राजेंद्र बर्डे (वय-२१ रा. घुंगरवाली चाळ, संतोष नगर, कात्रज) विकी धनंजय म्हस्के (वय २९, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मुळ, ता. हवेली), तेजस उर्फ भैया धनंजय म्हस्के (वय – २६, रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली), केतन गौरव कोंढरे (वय – १९, रा. सुजाता बंगला, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ) पुर्व शशीकांत सपकाळे वय २२ वर्षे रा.सर्वे नं. २०४, पापडे वस्ती भेकराईनगर, फुरसुंगी ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तर पृथ्वीराज संजय कांबळे रा. गणेश दत्त मंदीर, संतोष नगर, कात्रज), निखील मारूती शिंदे, पापळ वसाहत, बिबवेवाडी), अभिषेक बबन गव्हाणे, सुदाम बिबवेनगर, एस. आर. एस. गार्डनचे पाठीमागे, गंगाधाम, पुणे) सोनु राठोड असे पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, घातक शस्त्रे व मिरची पुड, बदलण्यासाठी कपडे, मोटारसायकलसह २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे गुन्हे शोध पथक हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत बाजीराव वीर, राजेश दराडे, संतोष होले, अमित साळुंके याचे पथक गस्त घालीत असताना शोध पथकातील राजेश दराडे व बाजीराव वीर ह्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, काही इसम हे लोणीकाळभोर, माळीमळा येथील राजेंद्र पेट्रोल लुटण्याच्या तयारीत असून ते कदमवाकवस्ती गावाचे हद्दीत हत्यारासह अंधारात थाबुन राहीले आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी सदर घटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना सांगितली. यावर चर्चा केली व आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मोकाशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक पथक तयार केले.मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर पथकाने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हददीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ गेले असता, तुळजाभवानी हॉटेलचे बाजुस रस्त्याचे बाजुला अंधारात ०८ ते १० संशयीत इसम बाजुला मोटार सायकली लावुन बोलत असताना दिसून आले. त्यानुसार संशयित इसमाकडे जात असताना हायवेवरून जाणारे वाहनामुळे प्रकाशात दिसले पोलीस दिसताच ते इसम त्या ठिकाणावरून पळून जावू लागले. त्यावेळी पाठलाग करून सहा जणांना पकडले.त्यांच्याकडे चौकशी केली असते त्यानी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्या अंगाची झडती घेतली असता तीन लोखंडी धारधार कोयते, मोबाईल, पेपरमध्ये गुंडाळलेली मिरची पूड, तीन मोटारसायकल असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, वरील आरोपींकडे अधिक चौकशी केली असता लोणी काळभोर येथील राजेंद्र पेट्रोल पंप येथे दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली आहे. तसेच यातील आणखी चार आरोपी हे पोलिसांची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.