हडपसर

स्लम साँकर चे प्रणेते विजय बारसे यांना पद्म व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत करावे : अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

हडपसर : नागराज मंजुळे यांनी झुंड चिञपटातून विजय बारसे यांचे झोपडपट्टीतील मुलांसाठी केलेले महान कार्य जगा समोर आणले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून शासनानी त्यांना  पद्म व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत करावे. अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे.

विजय बारसे हे नागपूरच्या एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देऊन त्यांना खेळाडू बनवले होते. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तसेच त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाच्या लीगचीही स्थापना केली. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात विजय बारसे यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली होती.विजय बारसे हे २००० सालच्या दरम्यान ते नागपूरमधील हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांना काही मुले पावसात तुटलेल्या बादलीला पायाने लाथ मारताना, त्याभोवती खेळताना दिसली होती. त्यानंतर त्यांनी त्या मुलांना फुटबॉल दिला. तेव्हा त्या मुलांनीही ते आनंदाने स्वीकारले होते. 

 विजय बारसे यांनी त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून पुढे २००२ साली ‘झोपडपट्टी फुटबॉल लीग’ची सुरुवात केली. कालांतराने हाच खेळ ‘स्लम सॉसर’च्या नावाने प्रसिद्ध झाला होता. यादरम्यान काहींनी त्यांना विचारलं होतं की, त्यांनी लीगचं नाव झोपडपट्टी फुटबॉल असं का ठेवलं? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, ‘मला माहित आहे की, ही सर्व मुले झोपडपट्टीतून आलेले आहेत. आणि मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे. म्हणून मी हे नाव ठेवलं’. विजय बारसे यांनी स्लम साँसर जागतिक पातळीवर घेवून गेले व एक अद्भुत कार्य केले यामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना योग्य वळण देवून भारत देशाचे नाव जगात उंचावण्याचे महान कार्य विजय बारसे यांनी केलेले आहे. या कार्याची दखल घेवून त्यांना भारत सरकारने पद्म व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली.