हवेली

लोणीकाळभोर पोलीसांकडून वाहन चोरी करणाऱ्या चोरटयांना अटक करून किं. रु.२,८०,००० (दोन लाख ऐशी हजार ) ची वाहने जप्त

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

काही दिवसांपूर्वी सागर दत्ताजय लोंढे रा. राईकर हॉस्पीटलचे मार्ग, श्रीआंगण ता. हवेली जि.पुणे यांची पेंशन पल्स मोटार सायकल नं. एम. एच. १२ एफ.जी. २१४५ ही त्यांचे घराचे खाली पार्कंगमध्ये लावली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करून नेली असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तक्रारी नंतर वरिष्ठपोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना गुन्ह्याचे तपास करण्याचे आदेश दिले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर याच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार संभाजी देविकर व शैलेश कुदळे यांना सदरचा गुन्हा हा विनोद सदाशिव पवार रा. मांजरी ता. हवेली जि. पुणे यांने त्याचे इतर साथीदाराच्या मदतीने केला असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली त्या अनुषंगाने तपास पथकाने वपोनि/राजेंद्र मोकाशी यांचे आदेशान्वये सापळा रचुन शिताफीने आरोपी चा पाठलाग करून त्यांना पकडले व पकडून त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) विनोद सदाशिव पवार वय ३१ वर्षे रा. घुले वस्ती, मांजरी रोड, मांजरी ता. हवेली जि.पुणे २) निवृत्ती दत्तात्रय बर्षे वय ३१ वर्षे, रा. गोपाळपटटी, मांजरी ता. हवेली जि.पुणे असे असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता आरोपी यांनी सदर गुन्हयाव्यतीरिक्त आणखीन दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले व तिसरा साथीदार सागर पवार याचे मदतीने केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडे अधिक तपास करून आरोपी विनोद सदाशिव पवार याचेकडुन गुन्हयात चोरलेली
१) एक स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम.एच.०३ एच.पी. १२६३.
२) एक मारुती ८०० कार नं.एम.एच.१२ सी.डी.३४८०
३) एक पेंशन मोटार सायकल नं. एम. एच. १२ एफ. जी. २१४५ तसेच गुन्हा करणेसाठी आरोपी यांनी वापरलेली
४) रिक्षा क्रमांक. एम. एच. १२ एन. डब्लु. ५२६० असा एकूण २,८०,०००/- (दोन लाख ऐशी हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास हनुमंत तरटे, पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस नाईक संभाजी देविकर, अजिंक्य जोजारे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार,राजेंद्र दराडे,सुनिल नागलोट यांचे पथकाने केली आहे.