पुणे

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प उरुळी कांचन- लोणी काळभोर येथे कुपोषित बालकांना औषधे व खाऊ वाटप

प्रतिनीधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर – उरुळी कांचन बीट 1 अंतर्गत
तिव्र कमी वजनाच्या मुलांसाठी औषधे व खाऊ वाटप नुकतेच कदम वाकवस्ती येथील पालखी स्थळा नजीकच्या अंगणवाडी येथे करण्यात आले ,
सदरील औषधे व खाऊ वाटप हे ज्ञानेश्वर काळभोर, आकाश काळभोर, धनंजय काळभोर यांनी मुलांसाठी दिले त्यावेळी रमेश निकाळजे, मुकुल शिंदे अंगणवाडी सुपरवायझर सौ धनश्री नायर मॅडम ,अंगणवाडी सेविका-चंद्रकला काळभोर, पल्लवी निकाळजे, अश्विनी फलटणकर,शीतल काळभोर, मदतनीस -प्रमिला मोरे, नंदा राजूरे, सुरवंता सुरवसे तसेच पालक व मुले या कार्यक्रमाला उपस्थित होते