Uncategorized

फोर-जी नको आता गुरुजीच हवेत डॉ. वसंत बुगडे ः इम्पिरियल अध्यापक विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन

हडपसर ः नको फोर-जी आता हवेत गुरुजी अशीच भावना आता पालक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे, असे मत जेएसपीएमचे संचालक डॉ. वसंत बुगडे यांनी व्यक्त केले.

हाडेवाडी रस्ता (ता. हवेली) येथील जेएसपीएम संकुलातील इम्पिरियल अध्यापक विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन आयोजित केले होते. याप्रसंगी प्राचार्य लक्ष्मण शेंडगे, प्राचार्य हरिश्चंद्र कुलकर्णी, प्राचार्य मनोहर कराळे, प्राचार्य खुशाल मुंडे उपस्थित होते. यावेळी प्रथम आणि द्वितीय वर्षातील गुणवंत छात्रांचा मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

प्राचार्य खुशाल मुंडे म्हणाले की, भावी पिढी घडविणारा शिक्षक आहे. शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदान केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत, संकुल संचालक डॉ. संजय सावंत व गिरीराज सावंत यांनी विशेष मार्गदर्शन केले. पंकजा पाचारणे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत ढवण यांनी प्रास्ताविक केले. स्वाती साळवे यांनी आभार मानले. सुप्रिया थोरात आणि सत्यभामा रुपनर यांनी पारितोषिक वितरणाचे नियोजन केले.