पुणे

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी व राडारोडा – ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांनी केला पाठपुरावा

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

गेली अनेक दिवसांपासून पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सिमेवरील असलेल्या पुलावर पावसाचे पाणी साचत असे त्याचा त्रास पदचारीसह दुचाकी वाहनचालकास होत असे यावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यातील कर्तव्यदक्ष अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे व सामाजिक कार्यात स्वतःस झोकून काम करणारे सदस्य यांनी हा विषय गांभीर्यपूर्वक घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना याची दुरुस्ती संदर्भात संपर्क केला यावर हा विभाग कार्यरत झाला व रस्त्यावरील साठलेले पाणि व राडारोडा काढून टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

लोणी काळभोर, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, बऱ्याच दिवसांपासून पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी व राडारोडा,साठला होता, यासाठी लोणी काळभोर गावच्या सरपंच सौ.माधुरी राजेंद्र काळभोर, मा.उपसभापती युगंधर काळभोर, मा.उपसरपंच राजेंद्र काळभोर, यांनी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, व सदस्य,सामाजिक कार्यकर्ते संजय आवारे,अमोल खोले, यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आज पुलावर जमा होणारे पाणी व राडारोढा काढून टाकण्यासाठी पाठपुरावा केला, सामाजिक मागनीची दखल घेत आज पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अभियंता राहुल औटे, कॉन्ट्रॅक्टर अश्विन तेलंगे, यांनी पुलावरील साफसफाईसाठी ब्रेकर-टॅक्टर पाठवून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या राडारोढयास अखेर हटविले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य यांना परिसरात कुठेही कसलेही सामाजिक काम असल्यास त्याचा शेवट लावण्याची कायम धडपड असते कोणी कितीही अडचणीत असला तर त्याला योग्य मदत कशी मिळेल यासाठी सतत धावपळ करणारे सदस्य त्याच्याच पाठपुराव्यातून हे काम पूर्णत्वास आले.