पुणे: प्रतिनिधी; (रमेश निकाळजे)
फुरसुंगी येथील भुई आळी मध्ये कल्याण मटका जुगार खेळताना ११ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या कडुन कल्याण मटका जुगार साहित्यासह ९ मोबाईल व ४ दुचाकी वाहने असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फुरसुंगी येथे मटका व जुगार मोठ्या संख्येने लोक खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उप-आयुक्त नम्रता पाटील, सहा. पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, तृप्ती खळदे, पोलीस अंमलदार वसिम सय्यद, गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूद्ध सोनवणे, अतुल पंचरकर यांच्या पथकाने सदरील धंद्यावर अचानकपणे धाड मारली त्यामध्ये तीन लाख रुपये मिळाले असे पोलिसांनी सांगितले, पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.