पुणे

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे – अझरुद्दीन सय्यद

(पुणे) मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे अल्पसंख्यांकांसाठी विविध कर्ज योजना राबवित असते अत्यंत गरीब असणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारासाठी थेट योजने अंतगर्त छोटे छोटे उद्योग सुरु करण्यासाठी रु ५००००/- पर्यंत कर्ज या योजने अंतगर्त देण्यात येते. सदर कर्जासाठी उत्पन्न मर्यादा फक्त ६५०००/- आहे. या योजनेअंतगर्त जास्तीत जास्त मुस्लिम लाभार्थ्यांनी बांगडी,पानपट्टी,सायकल दुरुस्ती,कपडे विकणे अशा प्रकारे उद्योग सुरु केले आहेत.आता पर्यंत या योजनेअंतगर्त रु १५८ कोटीचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

गेले ४ महिने महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत,वरील कर्ज योजनेतील लाभार्थ्यांचे सर्व भांडवल खाण्यामध्ये गेले आहे.अजून किती दिवस कोरोना प्रादुर्भाव राहील सांगू शकत नाही, हे लाभार्थी अत्यंत गरीब आहेत त्यामुळे कर्ज फेडू शकत नाहीत, तरी कृपया मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळच्या थेट कर्ज योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे कर्ज अंदाजे १५८ कोटी रुपये माफ करण्यात यावे अशी मागणी हडपसर येथील समाजिक कार्यकर्ते अझरुद्दीन सय्यद यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे

या कर्जाचे हफ्ते बाकी असल्याने लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलांना महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेता येत नाही व आर्थिक अडचणीमुळे ते उच्च व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

तरी आपल्याला विनंती करण्यात येते कि थेट कर्ज योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री उध्दवसाहेब ठाकरे व मा. श्री नवाब मलिक साहेब मंत्री,अल्पसंख्यांक विकास व औकाफ यांना करण्यात आली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x