पुणे

लोणी काळभोरच्या उपसरपंच पदी सौ. भारतीताई काळभोर यांची बिनविरोध निवड,

प्रतिनिधी -स्वप्नील कदम
पुणे सोलापूर महामार्गावरील मोठया लोकवस्तीचे गाव असलेल्या लोणी काळभोर गावच्या उपसरपंचपदी भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड झाली संगिता सखाराम काळभोर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली यात केवळ भारती काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले अशी माहिती लोणी काळभोरचे सरपंच तथा अध्याशीअधिकारी माधुरी राजेंद्र काळभोर यांनी दिली

सतरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये आज सरपंच माधुरी काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी जे एच बोरावणे यांनी काम पाहिले.आज विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यात एकूण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत केवळ भारती काळभोर यांचा अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला यावेळी यशवंतचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बँकचे संचालक सुभाष काळभोर, हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवदास काळभोर महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सिताराम भाऊ लांडगे, ग्रामपंचायत सदस्य योगेशनाना काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, ग्रा.पं. सदस्या ज्योतीताई अमित काळभोर, साविताताई गीताराम लांडगे, प्रियांकाताई सचिन काळभोर, ललिताताई राजेंद्र काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके, , आणि ग्रामविकास अधिकारी . जे एच बोरावणे, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.