औरंगाबाद

नाचनवेल तथागत गौतम बुद्ध परिसरात वृक्षारोपण

रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील नाचनवेल बसस्टँड तथागत गौतम बुद्ध परिसरात शुक्रवार दिनांक 22 रोजी गावातील तथागत मित्रमंडळाने व निसर्गमित्रानी पर्यावरणाच्या संतुलनासाठी व संवर्धनासाठी 24 तास ऑक्सिजन देणारी वृक्षांची व बोधी वृक्षांची तसेच विविध फुल झाडांची वृक्षारोपण करण्यात आली . वृक्ष संगोपनाची जबाबदारी सर्व तथागत मित्र मंडळ व निसर्ग मित्रांनी घेतली आहे पावसाळ्यामध्ये वृक्षरोपण सर्वच करतात परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे आपण लावलेल्या वृक्षांचे संगोपन होईल या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करावे व जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा. गावोगावी निसर्ग मित्र तयार होणे गरजेचे आहे पर्यावरणाच्या संतुलनासाठी असे मत निसर्ग मित्र यांनी व्यक्त केले. यावेळी नंदकुमार सुखधाने, दादाराव सुखधाने, योगेश सुखधाने अनिल चौथमल, निसर्ग मित्र रावसाहेब शिंदे, देविदास थोरात ,आदींनी वृक्षरोपण केली.