पुणे

लोणी काळभोर येथे पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, प्रतिनीधी स्वप्नील कदम,

लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (कवडी माळवाडी) येथील सुनील नारायण शिंदे वय- ५० वर्ष रा. कदम वाक वस्ती ( कवडी माळवाडी) ता. हवेली जि. पुणे, पोलीस हवलदार बक्कल नंबर ६५७६ नेमणूक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आज दी २८/७/२०२२रोजी रात्री ०२:००.ते सकाळी १०:०० दरम्यान त्यांच्या राहते घरी सिलिंग फॅनला पडद्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबियाकडे प्राथमिक चौकशी करता त्यांच्यावरती व कुटुंबीयांवरती त्यांच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे हडपसर पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता .दाखल गुन्ह्यामध्ये काल दिनांक २७/७/२०२२रोजी न्यायालयामध्ये तारीख होती. मध्ये मनाप्रमाणे चार्ज फ्रेम झाला नव्हता म्हणून त्याचे टेन्शन घेऊन त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती कुटुंबाकडून मिळाली आहे. सदर घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आली नाही. मयताचा मोबाईल ताब्यात घेतला असून अधिक तपास करीत आहोत.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके, लोणी काळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत.