पुणे

Crime News: पुण्यात 9 वर्षीय मुलावर मशिदीमधील कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; घटनेने कोंढवा परिसरात मोठी खळबळ…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. कोंढवा परिसरातील एका मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघजकीस आली आहे. 10 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मशिदीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणी पीडित मुलाच्या मामाने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

सदरील घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. परंतु आरोपी मोहम्मद युसुफ हा फरार झाला असून त्याचा कसून तपास चालू आहे. मोहम्मद युसूफवर पोलिसांनी पोक्सो (POSCO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 10 नोव्हेंबर रोजी मित्रासोबत पीडत मुलगा नमाज पठणासाठी उस्मानिया मजिदीत गेला. तेथे आरोपी सुध्दा उपस्थित होता. नमाज पठण झाल्यानंतर मित्रासोबत बोलत उभा असताना आरोपी त्यांच्या जवळ आला आणि त्यांना एका नमाज बद्दल थोडी माहिती दिली. त्यानंतर सर्व मित्रांना जाण्यास सांगितले आणि पीडित मुलाला घेऊन मजीदजवळील त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला.

 

त्यावेळी आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलगा अतिशय घाबरला.त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून तो मजिदमध्ये गेलाच नाही. याबद्दल घरच्यांनी विचारणा केली. पण त्याने काही सांगितले नाही. 10 दिवसांनंतर हा प्रकार घरच्यांना व मामाला सांगितला. त्यामुळे पीडित मुलाच्या मामाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.व आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रकारणी अधिकचा तपास कोंढवा पोलीस करत आहे.