पुणे

“सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा रिक्षाचालक जेरबंद, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद…

हडपसर, दि. 18 ः घराजवळ राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. राजेंद्र मारुती पाटील (वय 42, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादींच्या मुलीला रिक्षातून शाळेत सोडवत असताना एकटी असताना गुप्तांगास हात लावण्या सांगितला, तिचा हात पकडून गुप्तांगास लावला. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून बेडवर झोपवून अंगावर झोपण्याचा प्रयत्न केला, तिच्या छातीवर, मांडीवर हात फिरवला. कोणाला सांगू नको, नाही तर तुमचे काम सोडून देईल, अशी धमकी दिली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अबदागिरी करीत आहेत.