पुणेमहाराष्ट्र

पुण्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले;चोरट्यांकडून कुलुप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुणे शहरात वेगवेगळ्या भागात फ्लॅट फोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा एकूण 4 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.सदरील चोरीच्या घटना हडपसर आणि बिबवेवाडी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेऊन हे काम केले आहे. पुणे शहरात वेगवेगळ्या भागात फ्लॅट फोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा 4 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हडपसर मधील निर्मल टाऊनशिपसमोर, काळेपडळ, ( शुभम कुंजीर वय वर्ष 27) यांनी त्यांची चोरी झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे.
कुंजीर दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलुप तोडलेआणि कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा 2 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरुन पसार झाले. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामठे करत आहेत.

तसेच बिबवेवाडीमधील सुखसागरनगर परिसरात एका बंद बंगल्याची खिडकी तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. आणि बंगल्यातील कपाटातील 2 लाखांची रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत रोहित शेलार (वय 32, रा. प्रकल्पसिद्धी बंगला, सुखसागरनगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास बिबेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग करत आहेत.