कोल्हापुर

बड्या पेक्षा सामान्य माणसाकडे सरकारने लक्ष द्यावे डॉ सुभाष देसाई यांचे मत

कोल्हापूर ता.६
“किसनराव कुराडे यांनी छत्रपती शाहू महाराज संस्थानिक झाले नसते तर देश पातळीवरील नेते झाले असते या मध्यवर्ती कल्पनेवर पुस्तक लिहिले आहे त्यांनी यापूर्वी ऐतिहासिक विषयावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत आता यापुढे वैज्ञानिक विषयावर त्यांनी कादंबऱ्या लिहून नव्या पिढीला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा जेष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केली . राजर्षी शाहू स्मारक भवन मध्ये या पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.त्या मध्ये प्राचार्य जी .के .पवार ,हसन देसाई, चंद्रकांत निकाळे, सीमा पाटील ,राणी पाटील, युवराज कदम यांनी आपले विचार व्यक्त केले. कॉम्रेड चंद्रकांत यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉक्टर सुभाष देसाई पुढे म्हणाले” कोल्हापुरातील साहित्यिक, कलावंत, चित्रकार, कवी यांनी एकत्रित येऊन अन्यायाविरुद्धचा विद्रोह एकत्रितरित्या प्रगट करण्याची गरज आहे आणि सरकारने बड्यांच्या पेक्षा सर्वसामान्याच्या हिताकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे”
प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी पुस्तकामागची आपली भूमिका स्पष्ट केली आणि एमडी देसाई यांनी आभार मानले .कार्यक्रमाला मोठा पाऊस झाला असतानाही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.