कोल्हापुर

सेनापती कापशी परीसरात मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊसाचा धुमाकूळ

 

रोखठोक महाराष्ट्र न्यूज

कागल
सुनील कुंभार

      सेनापती कापशी   परिसरात सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास वादळीवाऱे व  मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला गेले दोन तीन दिवस गडहिंग्लज व निपाणी सह ईतर भागात परिसरात जोराचा अवकाळी पाऊस होत असून  दिवसभर हवामानात प्रचंड उष्णता जाणवते व   दुपारी पासुनच  विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह अचानक पणे पाऊस हजेरी लावत आसुन अनेक ठिकाणी गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.. त्यामुळे हवेत कमालीची गारवा निर्माण झाला अचानक आलेल्या पावसामुळे विठ्भठठी मजुर यांची एकच तराबंळ उडाली.. यामुळे जनजिवन विस्कळित झाले आहे.. चार दिवसांपासून दुपारी पाऊस व वादळीवाऱ्यासह पाऊस लागत आहे‌ .. निपाणी ,मुरगुड, गारगोटी,कागल, चंदगड आदी भाग वळिव पाऊसाने झोडपुन काढला आहे…