कोल्हापुर

प्रतिष्ठेच्या राजर्षी शाहू पुरस्काराने ग्रामीण भारतातील आरोग्यसेवेचे प्रणेते पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचा सन्मान

चंद्रकांत पाटलांनी केले बंग दाम्पत्याचे अभिनंदन

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून राजर्षी शाहू जयंतीदिनी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ग्रामीण भारतातील आरोग्यसेवेचे प्रणेते पद्मश्री डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला होता. काल कोल्हापूर येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग या दाम्पत्याने केलेले सामाजिक कार्य, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपध्दती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव असे विविध पैलू विचारात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून बंग दाम्पत्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू प्रेमी उपस्थित होते.