पुणे

चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन मोबाईल चोरांना लोणी काळभोर पोलिसांनी केले अटक

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार नागरिकांचे मोबाईल चोरी जाण्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी अनेक नागरिकांनी अज्ञात मोबाईल चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. मोबाईल चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस शिपाई आडके व भगत यांना ‘लोणी स्टेशन येथे दोन इसम मोबाईल विकण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

नवनाथ बबन शिंदे (वय २६, धंदा भाजीपाला विक्री, हनुमान मंदीराचे मागे लोणी स्टेशन, लोणीकाळभोर), मनोहर दिपक कांबळे (वय २४,धंदा हमाली, यशराज हाईट्स, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, राजेश दराडे, विश्रांती फणसे, सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, निखील पवार, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, पाटोळे, देविकर, आडके आणि भगत यांच्या पथकाने केली आहे.