पुणे

मोक्क्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील फरार गुंड रुपेश मारणे व संतोष शेलार यांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून २० कोटीची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे याला अटक करण्यात काल येश आले. गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील तो कुख्यात गुंड आहे, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी भागात लपून बसलेल्या रुपेश मारणे आणि त्याचा साथीदार संतोष शेलार या दोघांना रात्री उशिरा अटक केली.

पुणे पोलीस सहायक आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी पुण्यातील व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली होती असा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेंव्हापासून तो फरार झाला होता, कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई केली आहे, गज्या मारणे याला अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.

याप्रकरणी तपास सुरू असताना सराईत रूपेश आणि त्याचा साथीदार मुळशीत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक पाटील, अंमलदार सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली आहे.