पुणे

संविधान दिनानिमित्त गांधी चौक,हडपसर येथे सामुहिक संविधान वाचन

स्व अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिनानिमित्त हडपसर गांधी चौक येथे संविधान चे पूजन करून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधानाचे रक्षक हडपसर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे श्री दिनेश शिंदे उमेश शेलार, वानवडी पोलीस स्टेशनचे राजवीर रासगे तसेच हडपसर परिसरातील पत्रकार अनिल मोरे,  दिगंबर माने, अशोक बालगुडे, दीपक वाघमारे, सुनील थोरात, महेश टेळे, स्मिता बाबरे यांना संविधानाची प्रत बनकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र तात्या बनकर यांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी श्री व सौ रविंद्र जगताप,विक्रम आल्हाट विलास शेलार मोहन चिंचकर अनिल व्हावळ विद्या होडे, मीनाताई थोरात, संगीता बोराटे, शितल संजय शिंदे, सतीश आल्हाट, विवेक आल्हाट, साजन आल्हाट, राहुल अल्हाट, रमजान शेख, डॉ. किशोर सहाने, वामन धाडवे, अनिल सरूडकर, तात्या सोनवणे, संतोष ससाने, समीर मुलांनी, मुकेश सोनवणे, पंढरीनाथ बनकर, रणजीत चव्हाण, संतोष खरात, भूषण बिराजदार, प्रशांत कांबळे, योगेश कांबळे, सतीश कांबळे, मंगेश कांबळे, सौरभ जाधव, महादेव माकड, रतन हिंगणे, ऍड. पठारे, दिलीप भुजबळ, संतोष होडे, दिगंबर चव्हाण, सचिन आल्हाट आदी सर्व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.