पुण्यात तडीपार 3 महिला पुन्हा येरवड्यात! पोलिसांची धडक कारवाई

Rokhthok Maharashtra 11 0

पुण्यात गावठी दारू विक्रीप्रकरणी तडीपार करण्यात आलेल्या तीन महिलांना पुन्हा येरवड्यात आढळल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
शारदा राजू चव्हाण, वय ४५, लक्ष्मी देवी राठोड, वय ४५ आणि अनुसया नीलेश राठोड, वय ३२, अशी कारवाई करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या तिन्ही महिला येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहेत.
गावठी दारू विक्रीच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तडीपारीचे आदेश असतानाही त्या पुन्हा परिसरात वावरताना आढळल्या.
पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण, लहू गडमवाड, शाम शिपणे आणि रुपाली टोपे हे गस्त घालत असताना ही बाब समोर आली.त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर कदम, सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तसेच दत्तात्रय लिगाडे, महेश नलावडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे आणि श्रीनाथ कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.