प्रेमाचा रक्तरंजित शेवट! विवाहितेचं अपहरण, पद्मालयच्या जंगलात हत्या; आरोपी अटकेत
प्रेमाचा रक्तरंजित शेवट… विवाहितेचं अपहरण, जंगलात नेऊन निर्घृण हत्या!
जळगाव जिल्ह्यात जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका ३९ वर्षीय विवाहित महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कविता अरुण सुतार या महिलेचं ८ सप्टेंबर रोजी सकाळी घरातून अपहरण झालं होतं. मुलासाठी जेवणाचा डबा तयार केल्यानंतर त्या अचानक घरातून बेपत्ता झाल्या. मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाइल डेटाच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह आढळला.
तांत्रिक तपासातून पोलिसांनी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे, वय २९, याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या प्रेमसंबंधातील वादातून त्याने कविता यांचं अपहरण करून त्यांना पद्मालयच्या जंगलात नेलं आणि दगडाने डोक्यावर वार करून हत्या केल्याची कबुली चौकशीत दिली आहे.
या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा आता खुनाच्या गुन्ह्यात रूपांतरित झाला असून पुढील तपास सुरू आहे.
जुन्या प्रेमसंबंधाचा वाद इतका टोकाला गेला की एका महिलेचा जीव गेला… या हत्येमागचं नेमकं कारण काय? पोलिस तपासातून आता त्याचा उलगडा होणार आहे.





