वाहतूक पोलिसांना ५१ ‘कर्तव्याच्या काठ्या’ भेट!

Rokhthok Maharashtra 8 0

शिरूरमध्ये गणेश विसर्जनादरम्यान अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शिवबा संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुका, गर्दीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याला सलाम म्हणून ५१ ‘कर्तव्याच्या काठ्या’ भेट देण्यात आल्या.
यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांना काठ्या देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
तसेच शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्याबद्दलही शिवबा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
पोलिसांच्या हातातील काठी ही केवळ नियंत्रणाचे साधन नसून शिस्त, संरक्षण आणि कर्तव्याचे प्रतीक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक मजबूत व्हावे, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे शिवबा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.