न्यायालयाबाहेरच हल्ला; पुणे पोलीस नेमकं करताय काय? पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ॲड. मिलिंद पवार यांचे प्रश्नचिन्ह!

Rokhthok Maharashtra 6 0

पुणे पोलिसांना थेट सवाल ..!
गुन्हेगारांना रोखणार कोण..?
पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या बाहेर न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या एका व्यक्तीवर भरदिवसा प्राणघातक हल्ला होतो. त्याचे दोन्ही हात तोडले जातात. हल्लेखोरांकडे कोयते आणि रिव्हॉल्व्हर सारखी घातक शस्त्रे असतात.
आरोपी कात्रज येथून दोन दुचाकींवर ट्रिपल सीट विना अडथळा प्रवास करून शिवाजीनगर पर्यंत येतात. मग काही थेट प्रश्न उपस्थित होतात. कात्रज ते शिवाजीनगर या संपूर्ण प्रवासात एकाही वाहतूक पोलिसाला ट्रिपल सीट दुचाकी दिसल्या नाहीत का? अनेक सिग्नल, चौक आणि पोलीस ठाण्यांच्या हद्दी ओलांडून शस्त्रांसह प्रवास करणाऱ्यांना कुणीच अडवले नाही का? शहरात पोलीस गस्त, सीसीटीव्ही आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा असताना ही घटना रोखण्यात यंत्रणा कुठे कमी पडली? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? न्यायालयाच्या दारातच नागरिक सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
ही केवळ एका हल्ल्याची घटना नाही, तर पुणे शहराच्या पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे महत्त्वाचे आहेच; पण गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांना रोखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी नाही का?

पुणेकरांना आश्वासन नको, सुरक्षिततेची खात्री हवी आणि या गंभीर प्रश्नांची उत्तरे हवीत..

ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
(कृपया प्रसिद्धी साठी)

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.