त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुकाई टेकडीवरील स्वामी समर्थ मंदिरात भक्तिमय वातावरण; शेकडो दिव्यांनी मंदिर परिसर उजळला!

Rokhthok Maharashtra 72 0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त फुरसुंगी येथील तुकाई टेकडीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिरात दिवसभर धार्मिक विधी आणि सायंकाळी दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री स्वामी समर्थ यांच्या रुद्राभिषेकाने करण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजता श्री स्वामींची महाआरती श्री व सौ. सतीश भुजबळ तसेच श्री व सौ. चांद मुलाणी यांच्या हस्ते संपन्न झाली. आरतीनंतर स्वामीभक्तांनी मंदिर परिसरात शेकडो दिवे प्रज्वलित करून आकर्षक आणि नयनरम्य दीपसजावट केली. असंख्य दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. या दीपोत्सवाने मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

सायंकाळी ८ वाजल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राजाभाऊ होले यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 प्रतिनिधी – गणेश भागीवंत

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.