प्रदीप पूर्णेकर हत्या: मध्यरात्री मोठी घडामोड! पुरवणी FIR मध्ये मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंचं नाव

Rokhthok Maharashtra 12 0

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण! मध्यरात्री पुरवणी FIR मध्ये मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंची नावे
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी रात्री मोठी घडामोड घडली.
पूर्णेकर यांच्या मुलाने दिलेल्या पुरवणी जबाबाच्या आधारे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे पुरवणी FIR मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या दोघांवर हत्येच्या कटात सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीय आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन या दोघांची नावे FIR मध्ये घेण्याची मागणी केली होती.
या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर सुमारे दहा तास ठिय्या आंदोलन केल्याचेही वृत्त आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मात्र मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. तपासातून सत्य समोर येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, हत्येप्रकरणी पप्या शिंदे याला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेकडून हत्येमागील नेमके कारण आणि इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे.
आता पुरवणी FIR मध्ये नावे आल्यानंतर या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पुढे काय कारवाई होते, याकडे ठाण्याचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.