कात्रज घाटात दाम्पत्याला लुटले! दगडूशेठच्या दर्शनाला निघाले अन् तिघांनी मंगळसूत्र हिसकावले

Rokhthok Maharashtra 13 0

अंगारकीच्या दर्शनासाठी निघाले अन् कात्रज घाटात थरार! दाम्पत्याला अडवून एक लाखांचे मंगळसूत्र लुटले
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ तिघांनी अडवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
खेड शिवापूर येथील ४६ वर्षीय व्यक्ती पत्नीसमवेत दुचाकीवरून पहाटे पुण्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी कात्रज घाटातील बोगद्याजवळ दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडवली.
आरोपींनी दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी दिली आणि महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर तिघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
घाबरलेल्या दाम्पत्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांतच तिघांना ताब्यात घेतले.
तौहिद असल शहा, सुलेमान यासिन शेख आणि रोहित बबलू सिंग अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या तिघांची चौकशी सुरू असून, त्यांनी परिसरात आणखी अशा घटना केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.