प्रदीप पूर्णेकर हत्या: मित्रानेच रचला कट? गोळीबारानंतर रुग्णालयातही सोबत; हत्येला नवा ट्विस्ट
पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला? गोळीबारानंतर रुग्णालयात नेलं; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट!
ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काल रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णेकर यांच्यावर तब्बल पाच राऊंड गोळीबार करण्यात आला. त्यापैकी दोन गोळ्या लागल्या, तर धारदार शस्त्रानेही त्यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पप्या आणि पूर्णेकर यांची जुनी मैत्री होती. हल्ल्याच्या वेळी पप्या पूर्णेकर यांच्यासोबतच असल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबारानंतर इतर हल्लेखोर फरार झाले, मात्र पप्या शिंदे पूर्णेकर यांना रुग्णालयात घेऊन गेला. पोलिसांच्या तपासात त्याचा या कटात सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात एकूण पाच आरोपी असल्याची माहिती असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. क्राइम ब्रांचसह अनेक पथके आरोपींच्या मागावर आहेत.
मित्रच पडद्याआडून कटाचा सूत्रधार होता का? या हत्येचा नेमका मास्टरमाइंड कोण, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.





