अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण

Rokhthok Maharashtra 1 0

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पर्यावरण संवर्धनाला सहाय्यभूत होईल असे प्लास्टिक संकलन अभियान वर्षभर राबविले जात आहे. त्या अंतर्गत संकलित झालेले प्लास्टिक प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला सागर मित्र या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येते.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्लास्टिकचे संकलन केलेले ६० किलो प्लास्टिक खंडेनवमीनिमित्त सागर मित्र संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्लास्टिक संकलन अभियानाविषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पर्यावरणाप्रती संस्थेचे अध्यक्ष मा.अजित पवार यांची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाचे प्रायोजन असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश असल्याची सांगितले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सुनीता दानाई – तांभाळे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.